Welcome

Website counter
website hit counter
website hit counters

Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Tuesday, January 5, 2016

Ram Puniyani गागाभट्टाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला त्याबद्दल आर एस एस माफी मागणार का ? शिवाजी महाराजांना दैवी रुप देणारया आर एस एस चा जाहीर निषेध !

गागाभट्टाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला त्याबद्दल आर एस एस माफी मागणार का ? 
शिवाजी महाराजांना दैवी रुप देणारया आर एस एस चा जाहीर निषेध !

आर एस एस चा शिवशक्ती संगम म्हणजे शिवाजी महाराजांना वापरून मराठा समाजात घुसण्याचा डाव होय! 
परंतु राजकीय दृष्टीने जागृत मराठा समाज आर एस एस ला स्वीकारणार नाही.उलट आर एस एस चा हा डाव त्यांच्यावर (रीबाउंस) उलटणार आहे.
असे मत
ॲड.बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर राष्ट्रीय नेते भारिप बहुजन महासंघ यांनी पुणे येथे व्यक्त केले. 
पुढे त्यांनी स्पष्ट केले की, 
(१)शिवाजी महाराज थोर राजे होते,त्यांना सर्व लोक मानतात.कारण त्यांचे राज्य लोकशाहीचे व रयतेचे आणि धर्मनिरपेक्ष होते.
(२) गागाभट्टाने शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला होता. दूसरा राज्याभिषेक पुराणोक्त पध्दतीने केला.
(३)ब्राह्मण व इतरात भेद केल्या जातो.ब्राह्मणास वैदिक तर अन्य लोकासाठी पुराणोक्त धार्मिक विधि पूर्वी होते व आजही आहेत.
(४)गागाभट्टाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला त्याबद्दल आर एस एस माफी मागणार आहे काय?
(५)आर एस एस ने शिवाजी महाराजांची लोकशाही व धर्मनिरपक्षता स्वीकारलेली नाही.
(६)आर एस एस रयतेची नाही. उलट रयत मायनस म्हणजे आर एस एस आहे.
(७)शिवाजी महाराजावर कब्जा करुन त्यांना वापरून
मराठा समाजात आर एस एस ला घुसायचे आहे.बीजेपी चे सरकार आहे.आर एस एस ला हिंदू राष्ट्र निर्माण करण्या साठी शिवाजी महाराजांचा वापर करायचा आहे.
(८)शिवाजी महाराजांचा अंत कसा झाला?याचा शोध घेण्या साठी बीजेपी सरकार आर एस एस ची समिती नेमणार आहे.या समितीत खरे इतिहासकार सरकार घेणार काय?
ही वस्तुस्थिती विचारात घेतली तर माझे स्पष्ट मत आहे की,आर एस एस चा शिवशक्ती संघम द्वारे शिवाजी महाराजाना वापरून मराठा समाजात घुसण्याचा डाव राजकीय दृष्टीने जागृत मराठा समाज सहन करणार नाही. उलट हा डाव आर एस एस च्या अंगलट (रीबाउंस होइल) येइल. हे निश्चित.
ॲड.बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर
शब्दांकन - प्राचार्य म ना कांबळे,पुणे (भाग १)


--
Pl see my blogs;


Feel free -- and I request you -- to forward this newsletter to your lists and friends!

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...