Welcome

Website counter
website hit counter
website hit counters

Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Monday, July 13, 2015

कुठे नेऊन ठेवली माझ्या बाबाची चळवळ.....?


 
   
Ramrao Jumle
July 13 at 11:13am
 
कुठे नेऊन ठेवली माझ्या बाबाची चळवळ.....? 
मोदीच्या समरसतेला आठवले यांचा विरोध....! 
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त समता अभियानाची मागणी ...... 
रिपाई कार्यकारणीची सोमवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. त्यात आठवले यांनी वरील मागणी केली. 
हे बरं केलं पण आठवले यांचे ऐकते कोण.......? 
..... खरं म्हणजे राज्यात पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार व महामंडळाच्या नेमणुका होत आहेत. त्यामध्ये रिपाईला वाटा मिळावा अशी आग्रही मागणी केली. त्यासाठी आपण भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. (कारण नरेंद्र मोदी केंद्रात मंत्रिपद आणि वीरेंद्र फडणवीस हे राज्यात मंत्रिपद देण्यासाठी भाजप सत्तेवर आले तेव्हापासून आठवलेंना झुलवत आहेत. म्हणून आता भाजपाध्यक्ष अमित शहा यांचेकडे झोळी पसरणार....!) 
वसई आणि गोंदियाच्या पालिका निवडणुका स्वतंत्र लढल्यामुळे युतीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामधून धडा घेऊन पुढच्या वर्षी होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका युतीने एकत्रित लढवायला हव्यात असे आवाहनही आठवले यांनी मित्रपक्षांना यावेळी केली. (आठवले यांना किती काळजी आहे? भाजप आणि त्यांचे मित्र शिवसेना यांची....!) रिपाईला लेखी आश्वासन देवूनही भाजपने केंद्रात व राज्यात सत्तेत वाटा दिलेला नाही. तरीसुध्दा आपण युतीतून बाहेर पडणार नाही, असेही आठवले एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. ( याचा अर्थ आंबेडकरी चळवळ (आठवले यांची स्वाभिमानी चळवळ?) त्यांचेकडे गहाण ठेवली कि काय...?) 
एका कथेत द्राक्षाच्या झाडाकडे कोल्हा मान वर करून व तोंड वासून द्राक्षाचे फळ त्याच्या तोंडात कधी पडेल यासाठी तासनतास वाट पाहतो, तशीच गत आठवले यांची झाली आहे. 
माझ्या बाबाने २७ सप्टेंबर १९५१ रोजी केंद्रीय कायदेमंत्रीपदाला ठोकर मारली होती आणि हे मात्र झोळी घेऊन दारोदारी फिरत आहेत. तरीही ते माझ्या बाबाचे नाव छाती ताणून घेतात तेव्हा त्यांना काय म्हणावे....? 
संदर्भ- दैनिक दिव्यमराठी दि. ०७.०७.२०१५च्या बातमीवरून स्फुटलेख तयार केला.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...