Welcome

Website counter
website hit counter
website hit counters

Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Wednesday, September 18, 2013

समाज प्रबोधनासाठी हवे योग्य नेतृत्व - मेश्राम -

समाज प्रबोधनासाठी हवे योग्य नेतृत्व - मेश्राम
-Saturday, August 25, 2012 AT 02:30 AM (IST)

http://72.78.249.125/esakal/20120825/5470558461370559859.htm

सत्यशोधक विचार आणि जागृती मंच यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त "विशेष प्रबोधन संमेलन' गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी उत्तमराव पाटील, प्रा. जी. ए. उगले, प्रा. अशोक चोपडे, प्रा. विलास खरात, किशोर ढमाले, रमेश चव्हाण, रमेश राक्षे आदी उपस्थित होते. या प्रसंगी ऍड. अनंतराव दारवटकर लिखित "अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज चरित्र खंड 4' याचे प्रकाशन मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. 

मेश्राम म्हणाले, ""सत्यशोधक चळवळीच्या वारशाची माहिती तरुण पिढीला व्हायला पाहिजे. मतांसाठी पैसे देणाऱ्या व घेणाऱ्या दोन्ही व्यक्ती दोषी असतात; परंतु देणाऱ्याला दोषी ठरविले जात नाही. त्याबाबत कधी आवाज उठविला जात नाही. भ्रष्टाचार, आतंकवाद, नक्षलवाद व भूकबळी यांसारखे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. अनियंत्रित सत्तेवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने निर्माण होणाऱ्या या प्रश्‍नांचा अभ्यास करून युवा पिढीने आपला विचार समाजापर्यंत पोचवला पाहिजे.'' 

पाटील म्हणाले, ""महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजजागृतीचे कार्य केले. आपणही आता एका विचाराने काम करून ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.''

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...